आरोग्य कोरोना देश

अमित शहांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येईपर्यंत ‘हा’ नेता ठेवणार रोजा

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झालीये. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजप कार्यकर्ते शहा यांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतायत. तर जम्मू काश्मिरच्या एका नेत्याने अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

जम्मू आणि काश्मिरचे भारतीय जनता पक्षाचे नेते गुफ्तार अहमद यांनी अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्धार केला आहे. शहा यांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण रोजा ठेवणार असल्याचं गुफ्तार अहमद यांनी सांगितलंय.

गुफ्तार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गुफ्तार अहमद म्हणतात, “मंगळवारपासून मी दररोज रोजा ठेवणार आहे. अमित शहांना लवकर बरं वाटावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहे. अमित शहा यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येत नाही तोपर्यंत रोजा ठेवणार आहे.”

रविवारी अमित शहा यांनी ट्विट करुन आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन आणि चाचणी करण्याचा सल्ला दिलाय. त्यापूर्वी ते एका बेविनारमध्ये सहभागी झाले होते. त्याशिवाय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उपस्थिती लावली होती. त्यामुळे शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर मंत्रिमंडळात गोंधळ उडाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनावरची लस आली तरी…’; WHO प्रमुखांच्या वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं

रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरियर्स बहिणींकडून बांधून घेतली राखी!

मनसेच्या अविनाश जाधवांना दिलासा नाहीच, जामीन अर्ज फेटाळला!

वर्दीतलं रक्षाबंधन…. ‘महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा!’

सम-विषम फॉर्म्युला बंद, मुंबई महापालिकेचा दुकानांनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या