Maharashtra l छत्रपती संभाजीनगर ते बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) असा रेल्वे प्रवास लवकरच कमी वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला ‘फास्ट ट्रॅक’वर आणत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी आवश्यक त्या तपासणीचे आदेश दिले आहेत.
प्रवासासाठी रेल्वेमार्ग ठरणार फायदेशीर :
सध्या छत्रपती संभाजीनगरहून बीड आणि धाराशिवला जाण्यासाठी रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे तिन्ही जिल्हे रेल्वेने जोडण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे.
जुलै २०२२ मध्ये नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. या सर्वेक्षणामध्ये धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचा समावेश होता. परंतु, त्यानंतर हा प्रस्ताव प्रलंबित होता. बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर, रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाच्या मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
Maharashtra l रेल्वे मार्गामुळे होणारे फायदे :
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनापेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करता येईल.
याचा फायदा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांना होईल. तसेच, या भागांतील कृषी उत्पादनांची वाहतूक करणे सोपे होईल. त्यामुळे व्यापार आणि उद्योग वाढण्यास मदत होईल.