बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली | पाकिस्तान मध्ये एका हिंदू परिवारातील 5 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटना रहीम यार खान शहरात घडल्याचं सांगतीलं जात आहे. या लोकांवर चाकू आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. संशयितरीत्या त्यांचे मृतदेह आढळून आले. अत्यंत निर्घृणपणे त्यांचा गळा चिरण्यात आला होता. त्यांचे मृतदेह रहीम यार खान शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर त्यांच्या निवासस्थानी आढळून आले आहेत.

भेटलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांपैकी एकाचं नाव रामचंद होतं. ते मेघवाल हिंदू होते आणि त्यांचं वय 35 ते 36 वर्षे होतं. ते अनेक वर्षांपासून टेलरिंगचा व्यवसाय करत होते. रामचंद हे खूप शांत व्यक्ती होते आणि आनंदाने जगत होते. या घटनेनंतर प्रत्येकजण अस्वस्थ आहे. तर स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्रास्त्र पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यात चाकू आणि कुऱ्हाडींचा समावेश आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी घटनेची माहिती मिळवली असून, आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी न्यूज इंटरनॅशलमधून रहिम यार खान शहारातील सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परिवाराची हत्या करण्यात आली आहे. त्यांचं कुणाशीही शत्रूत्व नाही.

दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. इथे अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. हिंदू कुटुंबातील मुलींचं अपहरण केलं जातं. शांततेत जीवन जगत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांची अत्यंत निघृणपणे हत्या केली जाते.

थोडक्यात बातम्या –  

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस

बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More