बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुढीपाडव्याला घेतला होता नवाकोरा ट्रॅक्टर, बाप-लेकासाठी तोच ठरला काळ!

जुन्नर | गुढीपाडव्याला घेतलेला नवाकोरा ट्रॅक्टरचा वडील आणि मुलासाठी काळ ठरला. पुण्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या अपघातात बापलेकाला मृत्यू झाला आहे. शेतीच्या मशागतीसाठी जाताना हा अपघात झाल्याचं कळतंय. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील राळेगण येथे हा अपघात झाला आहे.

कल्याण येथील पोलीस ठाण्यामधे कार्यरत असलेले 56 वर्षीय सोपान उडे सुट्टी घेऊन गावाला आले होते. नुकताच गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता. ट्रॅक्टर चालक संदेश तळपे, सोपान उडे आणि त्यांचा 20 वर्षीय मुलगा तेजस शेतीच्या मशागतीसाठी शेतावर चालले होते.

चढणीच्या रस्त्यावर अंदाज न आल्याने ट्रॅक्टर 20 फूट खोल असलेल्या बाजूच्या शेतात कोसळला. त्यामध्ये वडील-मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, पुण्यात एका निर्दयी बापाने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. या बापाने आपली मुलगी एका मुलाशी बोलते याचा राग धरत पोटच्या दोन्ही मुलींना ठार मारलं. मुलींना चालत्या ट्रकसमोर झोपवत या बापाने त्यांच्या अंगावर ट्रक घातल्याची घटना समोर आली होती. आपल्या दोन मुलींचा जीव घेत या बापाने स्वत:लासुद्धा संपवलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

जिगरबाज! लहान मुलाला वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनी केलं कौतुक; पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं तर बरं होईल”

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More