बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वडिल पुस्तकाला पैसे देत नाहीत, रोज दारु पितात’, मुलाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. एखादा व्हिडीओ इतर व्हिडीओपेक्षा थोडा वेगळा किंवा हटके वाटला तर तो सोशल मीडियावर क्षणातच व्हायरल होत असतो. अशातच एका लहान मुलाचा शाळेतील रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ बिहारमधील असून सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक एका मुलाला ओरडत असल्यातं पहायला मिळत आहे. तू पुस्तक का विकत घेत नाही? असं म्हणत शिक्षक मुलाला ओरडत आहे. यावर मुलगाही रडत रडत खरी व्यथा सांगतो. मात्र त्याच्या उत्तरानं हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नावर मुलानं म्हटलं की, वडील सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करतात मात्र अभ्यासासाठी पुस्तक विकत घ्यायला त्याला पैसे देत नाहीत. यावेळी मुलाचे वडिलही तिथेच उपस्थित होते. मुलगा शिक्षकांना रडत रडत पुस्तक न आणण्याचं कारण सांगत असताना मात्र त्याचे वडिल हसताना दिसले.

दरम्यान, शिक्षकांनी पाच दिवसांपासून सतत सांगूनही मुलानं पुस्तक न घेतल्यानं शिक्षकांनी हा व्हिडीओ बनवला असल्याचं पहायल्याचं मिळतंय. हैराण करणारी बाब म्हणजे आपल्या मुलाचं बोलणं ऐकून त्याचे वडील हसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

महागाईची झळ; सीएनजीपाठोपाठ आरे दूधही ‘इतक्या’ रुपयांनी महागले

अनिल कपूर यांची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज? जर्मनीतून शेअर केला व्हिडीओ

‘…म्हणून मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

“पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर…”

महागाईचा भडका; सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More