बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या लोभापाई सासऱ्याने सुनेला विकलं अन्…; अशा प्रकारे झाला उलगडा

नवी दिल्ली | प्रत्येक मुलगी सासरी गेली की तिच्या पतीचे आई-वडील तिच्या आई-वडीलांसारखे असतात. सासारच्यांनीही आपल्यावर प्रेम करावं अशी मुलीची भावना असते. मात्र काही ठिकाणी सुनेला प्रेमाने वागवणं सोडाच पण काही सुनेबाबत विकृत विचार करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये घडली आहे. बाराबंकी येथील मल्लापूर गावात ही घटना घडली आहे.

चंद्रराम वर्मा या सासऱ्याने माणुसकीला काळीमा फासणार कृत्य केलं आहे. चंद्रराम वर्मा यांच्या मुलाच्या 2019 मध्ये  आसाममधील मुलीशी प्रेमविवाह झाला होता. मुलगा प्रिंस आणि त्याच्या पत्नीची एका डेटींग अॅपवर ओळख झाली होती. लग्नानंतर दोघांचा सुरळीतपणे संसार चालू होता. मुलगा प्रिन्स आपल्या मुलासोबत रहायला गाझियाबादला गेला.

इकडे चंद्रराम वर्मा यांना वाईट बुद्धी सुचली आणि त्यांनी पैशाच्या लोभापाई आपल्या सुनेला विकण्याचा विचार केला. त्यांनी आपल्या मुलाला काहितरी कारण सांगत सुनेला घरी बोलावून घेतलं. 4 जूनला सून घरी आली त्यांनी रामू गौतम नावाच्या दलालासोबत कट आखला. रामू गौतम याने गुजरातचा तरुण साहिल आणि त्याच्या कुटुंबियांना बाराबंकी येथे बोलावलं. त्यानंतर दोघी पक्षांची चर्चा झाली. चर्चेअंती 80 हजारात सौदा झाला. आरोपी सासऱ्याने 80 हजारात सूनेला विकण्याचा सौदा केला.

दरम्यान, बापाच्या कारस्थानाची माहिती एका नातेवाईकाने प्रिन्सला दिली. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत  कारवाईला सुरूवात केली. कारवाईमध्ये पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर महिला सापडली. पोलिसांनी महिलेसोबत असणाऱ्या आठ जणांना अटक केली. यामध्ये सासऱ्याचासुद्धा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! पुणेकरांचं कोरोना मुक्तीकडे पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

भर मंडपात नवरदेवाचे फाडले कपडे अन्…; व्हायरल झाला व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More