Crime News l मुंबईतील (Mumbai) कुर्ला परिसरात एका धक्कादायक घटनेत जन्मदात्या बापानेच कौटुंबिक वादातून आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला फरशीवर आपटून ठार मारले. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी (Police) हत्येचा गुन्हा दाखल करून परवेज फकरुद्दीन सिद्दिकी (वय ३६) याला अटक केली आहे.
कौटुंबिक वाद ठरला कारण :
आफिया असे मृत मुलीचे नाव असून, ती आई-वडिलांसोबत येथील एलआयजी कॉलनी परिसरातील इमारत क्रमांक ३६ मध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेज सिद्दिकी (Parvez Siddiqui) हा बेरोजगार होता.
शनिवारी दुपारी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा पत्नीच्या कुशीत असलेल्या आफियाला (Afiya) हिसकावून फरशीवर आपटले.
यामध्ये आफिया (Afiya) गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कुर्ला (Kurla) येथील भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) नेण्यात आले, मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. आफियाची आई सबा परवेज सिद्दिकी (वय २६) हिच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
Crime News l पोलिसांची कारवाई :
सुरुवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, आफियाच्या (Afiya) आईने सर्व हकीकत सांगितल्यावर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून परवेजला अटक केली. या दाम्पत्याला तीन मुली असून आफिया (Afiya) सर्वात लहान होती.