बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापमाणूस! लेकीच्या ‘ऑनलाईन क्लास’साठी मुसळधार पावसात छत्री घेऊन राहिला उभा

बंगळुरु | प्रत्येक आई वडिल सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपली मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन अहोरात्र झटत असतात. अशातच आज कर्नाटकमधून एका बाप-लेकीचा आलेल्या फोटोनं सोशल मीडियावर अनेकांची मन जिंकली आहेत.

सध्या कोरोनामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण असल्यानं लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे शाळाही बंद आहेत. अशा परिस्थीतीत आॅनलाईन अभ्यास सुरु केला आहे. मात्र अनेक ठिकाणी आॅनलाईन शिक्षणासाठी व्यत्यय येत असल्याचं दिसून येत आहे.

एक बाप आपल्या मुलींच्या आॅनलाईन क्लाससाठी मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला छत्री घेऊन उभा राहिला असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक लेक आॅनलाईन क्लास ऐकताना दिसते तर दुसरी लेक बाजुला उभी आहे.

दरम्यान, दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बालक्का गावातील हा फोटो असून मुलींच्या वडिलांचं नाव नारायण आहे. लेकीसाठी मुसळधार पावसात ढाल बनून उभा ठाकलेल्या बापाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

हृदयद्रावक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यावर मुलानं अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

दिलासादायक! महाराष्ट्रात आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

‘बाळासाहेबांबत राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं’; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More