बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावांकडून वडिलांचा छळ, विजय शिवतारेंच्या मुलीच्या फेसबुक पोस्टनं खळबळ

मुंबई | शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री विजय (बापू) शिवतारे यांच्या मुलीने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून स्वतःच्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे यांनी विजय (बापू) शिवतारे यांची माझ्याच सख्ख्या भावाने संपत्तीच्या लोभापायी दयनीय अवस्था केली आहे, हे पाहून मी अस्वस्थ आहे, असं लिहिलं आहे.

“बापू सारखे वडील मिळाली हे माझं भाग्य आहे. त्यांनी मला आयुष्यात सर्व काही दिलं, फुलासारखं जपलं आणि त्यांचं स्थान माझ्यासाठी देवापेक्षाही वर आहे. अशा माझ्या बापूंना माझे सख्खे भाऊ संपत्तीच्या लोभापायी त्रास देत आहेत”, असा गंभीर आरोप केला आहे. मागील काही दिवसात फेसबुकवर होत असलेल्या पोस्टमुळे मनात संभ्रम निर्माण केला असून माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून बापूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ममता यांनी लिहिलं आहे.

मागच्या वर्षी विजय शिवतारे यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वाचण्याची शक्यता अत्यल्प असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि बापूंचा जीव धोक्यात असताना देखील माझा मोठा भाऊ सतत मानसिक त्रास देत असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच किडनीच्या आजारामुळे दीड वर्षांपासून एक दिवस आड डायलिसिसला बाबांना जावं लागत आहे. तरीसुद्धा दोन्ही भावांपैकी एकही त्यांना भेटायला आला नाही किंवा साधी विचारपूसही केली नाही, असा गंभीर आरोप ममता यांनी सख्या भावांवर केला आहे.

दरम्यान, विजय शिवतारे यांच्या मुलीने केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे. तसेच विजय शिवतारे यांच्या पत्नीने फेसबुक लाईव्हद्वारे मुलीने केलेले सर्व आरोप धादांत खोटे आणि चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. पण हे सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं असल्याने त्यांना पहाटे ह्रद्य़विकाराचा झटका आला आणि रात्री दोन वाजता त्यांना आयसीयूमध्ये मी दाखल केलं असल्याचं सांगत ममता यांनी बाबा अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील, असं म्हणत प्रार्थना केली आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! कोरोनाकाळात ‘या’ जिल्ह्यातील 69 अल्पवयीन मुली बेपत्ता; सोशल मीडिया कारणीभुत?

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More