Top News देश

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यूट

नवी दिल्ली | आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं अशी प्रत्येकाच्या आई-बापाची इच्छा असते. स्पप्न पुर्ण करण्यासाठी मुलं सर्व पणाला लावून आपल्या ध्येयाचा पाठलाग करतात. जेव्हा ते स्वप्न पुर्ण होतं तेव्हा त्या मुलांपेक्षा त्यांच्या आई-बापाचा आनंद गगनात मावत नाही. अशाच प्रकारे एका तरूणीने आपलं ध्येय पुर्ण केलं आणि तिच्या यशाला वडिलांनी एक कडक सॅल्यूट मारला आहे.

आंध्र प्रदेशमधील पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी DSP पदावर असलेल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रशांती यांना सॅल्यूट केला आहे. बाप-लेकीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रशांतीचे वडील श्याम सुंदर तिरुपती कल्याणी डेम पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनी तिरुपती येथे 3 जानेवारी 2021 रोजी पोलिस ड्यूटी मीट 2021 कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान,  या कार्यक्रमात मुलीच्या वडिलांनी मुलीला केलेलं सॅल्युट पाहून अधिकारी देखील भावुक झाले होते. आंध्र प्रदेश पोलिसांच्या पोलीस इन्स्पेक्टर सुंदरचीही याच पोलीस मेळाव्यात आपली ड्युटी करत होते. त्याच वेळी प्रशांती त्यांना दिसली तिला पाहता क्षणी त्यांनी सॅल्युट केलं.

 

थोडक्यात बातम्या-

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी”

राजकारणात प्रवेश करणार का?, सोनू सूद म्हणाला…

अखिलेश यादव यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका, म्हणाले…

कंगणा-उर्मिलाच्या वादात रोहित पवारांची उडी; ‘महाराष्ट्रद्रोही भाजपचा….’

नागपूरवाले मला म्यूट का करतात?; उद्धव ठाकरेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या