मुंबई | मुलुंडमधल्या 61 वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांचा मृत्यू झाला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने टाकलेल्या निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेलं मात्र तिथं तपासणी केली असता त्यांचं आधीच निधन झाल्याचं सांगण्यात आलं.
गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे. पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोवरच फट्टोमल हे बँकेत जाण्यासाठी निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यु झाला.
पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा परिणाम झाला आहे. आपली आयुष्यभराची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. फट्टोमल यांच्या खात्यात 8 ते 10 लाख रुपये होते. ही त्यांच्या आयुष्याची कमाई होती. मात्र ती त्यांना मिळणार की नाही याबाबत शंका त्यांना निर्माण झाली.
संजय गुलाटी आणि फट्टोमल पंजाबी या दोन खातेधारकांच्या मृत्यूमुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या आंदोलनाला वेगळे वळण लागलं आहे. कँडल मार्च काढून त्यांना श्रद्धांजली श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी, पण…- नारायण राणे- https://t.co/QWBfGen5kq #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 16, 2019
“जयकुमार गौरेंच्या नशिबात मंत्रिपद तर नाहीच, पण त्यांचं डिपाॅझिटही जप्त होईल” https://t.co/Z5t7xofP4F
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार वांझोटा होता; राज ठाकरेंची जोरदार टीका https://t.co/DQFl5SFsov @RajThackeray @prithvrj
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
Comments are closed.