68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी

नवी दिल्ली |फेसबुक कडून झालेल्या एका चुकीमुळं तब्बल 68 लाख युजर्सचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाल्याचा प्रकार घडला आहे. या बद्दल फेसबुकनं युजर्सची माफी मागितली आहे.

फेसबुकच्या एका ‘बग’ म्हणजे चुकीमुळं युजर्सचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटो युजर्सनी लिंक केलेल्या ॲपमध्ये दिसत होते. 

फोटो सार्वजनिक होण्याचा प्रकार 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत घडला होता. एखाद्या युजर्सचे गोपनीय फोटो सार्वजनिक झाल्यास फेसबुक त्यांना नोटिफीकेशन पाठवणार आहे.

दरम्यान, युजर्सनी आपले फेसबुक खाते ॲपशी लिंक करताना काळजी घ्यावी, असं फेसबुकनं म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

-निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!