थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

31st December celebration l वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक नियम लागू होतात. कारण वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून 31 साजरा केला जातो. त्यामुळे अनेक नागरिक बाहेर फिरायला जातात तर काही नागरिक हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करता. त्यामुळे अनेकजण काहीना काही कारणामुळे घराबाहेर पडतात. मात्र या पार्श्वभूमीवर एफडीएने एक मोठं पाऊल उचललं आहे.

थेट कारवाई होणार? :

31 च्या या पार्टी दरम्यान संधी साधून निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, तसेच अन्नातून कोणालाही विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीए हॉटेल, रेस्टॉरंट व क्लबवर बारकाईने नजर ठेवणार आहे. त्यामुळे आता 5 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये एफडीए विशेष तपासणी करण्याची मोहीम हाती घेणार आहे.

मात्र या मोहिमेदरम्यान रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यासंदर्भात खातरजमा करण्यात येणार आहे. याशिवाय या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 यामधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

31st December celebration l या मोफत क्रमांकावर तक्रार करा :

या कालावधीदरम्यान अन्नपदार्थांची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या मोफत क्रमांक 1800222365 वर करावी असे आवाहन देखील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता 31च्या पार्टीसाठी हॉटेल किंवा पबमध्ये जाताना जपून जा असा सल्ला देखील अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकांना दिला आहे.

News Title – FDA is going to check hotels and restaurants ahead of 31st December 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?

‘त्या’ प्रकरणी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा!

आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त

हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा