बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात भीतीचं वातावरण, आजचा सामना पुढे ढकलला!

नवी दिल्ली | आयपीएल 2021 स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्यानं खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. तरी देखील खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर, मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय मायदेशी परतले आहेत. त्यानंतर घरच्यांना कोरोनाची लागण झाल्यानं आर. अश्विननं स्पर्धेतून माघार घेतली आहे.

दरम्यान, स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील 10 कर्मचारी आणि बीसीसीआयनं स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या 6 सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.

थोडक्यात बातम्या

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

“धमकी कोण देतंय उघड झालंच पाहिजे, पुनावालांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल”

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More