बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे लहान मुलांची चोरी होत असल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे. याच भितीतून पालकांनी मुलांच्या पायाला साखळी बांधून कुलूप लावल्याचं समोर आलं आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

माहुआ खेडा येथील सरोज नगरात रस्त्यावर झोपडी बांधून काही लोहार कुटुंबे राहत आहेत. लोहार कुटुंबे गरिबीमुळे रस्त्याच्या कडेला राहतात आणि त्यांच्या मुलांसाठी जगतात. 22 जून रोजी एक 2 वर्षाची मुलगी खाटेवर झोपली होती. त्याच वेळी पहाटे 4 वाजता अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या मुलीला झोपडपट्टीतून उचलून आपल्याबरोबर नेलं.

नातेवाईकांना झोपेतून जाग येताच मुलगी तिथे नव्हती. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. जेव्हा मुलीचा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा घरातील सदस्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. गुन्हा नोंदवूनही पोलिस हरवलेल्या 2 वर्षाच्या मुलीचा शोध घेऊ शकले नाहीत.

दरम्यान, हरवलेल्या मुलीच्या कित्येक दिवसानंतरही पोलिसांना शोध लागला नाही. नंतर आजूबाजूच्या पालकांना आपल्या मुलांच्या चोरीची भिती सतावू लागली. यामुळे त्यांना आपल्या मुलांना लोखंडी साखळ्यांनी बांधलं आणि कुलूप लावलं आहे. जेणेकरून कोणीही त्यांच्या मुलांना उचलून घेऊन जाऊ शकणार नाही.

थोडक्यात बातम्या-

‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची जहरी टीका

“भाजपने आमचे आभार मानावेत; मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

“जे पद मिळालं त्यापेक्षा राणेंची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

आजारी असतानाही खडसे चौकशीसाठी हजर, म्हणाले ‘चौकशी मागे राजकीय हेतू आहे’

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More