Children Health | आजकाल पालक आपल्या मुलांना जेवताना मोबाईल किंवा टीव्ही (TV) दाखवण्याचा शॉर्टकट वापरतात. मुलं स्क्रीनकडे लक्ष देतात आणि अन्न पटकन खातात, त्यामुळे पालकही निश्चिंत होतात. मात्र, ही सवय मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. (Children Health )
मोबाईल-टीव्ही पाहत जेवण देण्याचे धोके
शास्त्रीय संशोधनानुसार, जेव्हा मुलं मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवतात, तेव्हा त्यांना अन्नाबद्दल जागरूकता राहत नाही. एन्व्हायर्नमेंटल जर्नल ऑफ हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवण करणाऱ्या मुलांमध्ये पुढील समस्या दिसून येतात:
अन्नाबद्दल नखरे करण्याची प्रवृत्ती वाढते.
लहान कारणांवरून मुलं जास्त चिडचिड करतात.
लठ्ठपणाचा धोका वाढतो, जो भविष्यात मधुमेह, हृदयविकार आणि इतर आजारांना कारणीभूत ठरू शकतो.
WHO चा गंभीर इशारा
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अलीकडील अहवालानुसार, 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित असावा. जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. WHO ने मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट्सपासून मुलांना शक्य तितके दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
पालकांनी काय करावे?
मुलांना जेवताना टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर ठेवावे.
जेवणाच्या वेळी कुटुंबासोबत एकत्र बसून संवाद साधावा.
मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा. (Children Health)
Title : Feeding Children While Watching TV-Mobile is Harmful to Children Health