बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृदयद्रावक घटना! महिला सरपंच झाली मात्र फक्त घरच्यांमुळे आयुष्याची लढाई हरली

नाशिक | राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून महिलांना राजकारणातदेखील आरक्षण लागू करण्यात आलं आहे. आज राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला सरपंच असलेल्या आपल्या पहायला मिळतात. महिला सरपंचांकडून वारंवार काम करण्यात अडचणी आणल्या जातात अशा तक्रारी ऐकायला मिळतात. परिणामी कधी कधी महिला सरपंच टोकाचं पाऊल देखील उचलतात.

नाशिक जिल्ह्यातील मरळगोई (खु) या गावाच्या सरपंच महिलेनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. योगिता अनिल फापाळे या मरळगोई गावाच्या सरपंच होत्या. त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती होताच त्यांच्या पतीनं त्यांना दवाखान्यात दाखल केलं. पण डाॅक्टरांच्या अथक परिश्रमानंतरही त्यांना वाचवण्यात अपयश आलं.

योगिता यांना सरपंच झाल्यापासून घरच्यांनी त्रास देण्यास चालू केलं होतं, असा आरोप योगिता फापाळे यांच्या भावांनी केला आहे. योगिता या जेव्हा गावातील कामानिमित्त बाहेर जायच्या तेव्हा त्यांना चारित्र्यावरून काहीही बोलण्यात यायचं असाही आरोप केला आहे. योगिता यांच्या भावाच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, योगिता फापाळे यांच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुढील तपास पोलीस करत आहेत. नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं राज्यात सर्वत्र खळबळ माजली आहे.

थोडक्यात बातम्या 

राज्याच्या राजकारणात नवे संकेत, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

चला मला अटक करा!, कंगनानं पोस्ट केला वाईन पितानाचा हॉट फोटो

कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय

LIC च्या ‘या’ स्कीमद्वारे मुलीचं भवितव्य होईल सुरक्षित, लग्नाच्या वेळी मिळतील 22 लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More