बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

मुंबई | बकरी ईद निमित्त मुंबईतील देवदर कत्तलखान्यामध्ये जास्तीत जास्त 300 गुरांची कत्तल करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली होती. मोठ्या गुरांची कुर्बानी म्हणून ही परवानगी देण्यात आली आहे. त्याविरोधात अल कुरेश ह्युमन वेलफेअर असोशियएशन आणि ऑल इंडिया जमौतुल कुरेश या संघटनांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने या संघटनांना फटकारलं आहे.

कोरोना संकटामुळे राज्य सरकारने सध्या सर्व सणांवर निर्बंध आणि मर्यादा घातल्या आहेत. सरकारच्या या निर्बंधात नागरिकांच्या इच्छेप्रमाणे बदल केला जाऊ शकत नाही. अन्यथा सरकारी प्रशासनांना कोरोना संकटावर नियंत्रण मिळवणं अवघड होईल. सध्या नागरिकांच्या जिवाचं रक्षण होणं महत्त्वाचं आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

किती गुरांच्या कत्तलीला परवानगी द्यायची, हा निर्णय महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित आहे. कोरोनाचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. नागरिकांच्या जिवाच्या रक्षणासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. त्याचबरोबर न्यायालयाने दाखल केलेले दोन्ही अर्ज फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, मुंबईतील देवदर कत्तलखान्यामध्ये बकरी ईदच्या दिवशी 700 ते 1000 गुरांची कत्तल करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका अल कुरेश ह्युमन वेलफेअर असोशियएशन आणि ऑल इंडिया जमौतुल कुरेश या संघटनांनी केली होती. त्यावरून दोन्ही अर्ज फेटाळत न्यायालयानं संघटनांना फटकारलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

“पेगॅससचे खरे बाप देशातच”; सामनातून शिवसेनेची ‘ही’ आक्रमक मागणी

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More