बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अज्ञातांकडून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद |  औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर पिवळा रंग टाकून औरंगाबाद नाव खोडून त्या जागी ‘संभाजीनगर’ लिहिण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संबंधितांना तात्काळ अटक केली जाईल, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं, अशी खूप दिवसांपासूनची शिवसैनिकांची मागणी आहे. शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर असंच म्हणतात.

महत्वाच्या बातम्या-

-आपल्याच पक्षाचा भ्रष्ट कारभार चव्हाणांच्या लक्षात आला असावा- सचिन सावंत

-आपले विचार आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावे; रवीनाने झायरला सुनावले

-…आणि शिव ठाकरेला रडू कोसळलं

-सामान्यांना दिलासा; आजपासून एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त

-“…तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकवरुन फेकलं असतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More