नवी दिल्ली | 18 जुलै रोजी भारताच्या 16व्या राष्ट्रपतीपदासाठी (President) निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे.
एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना तर सर्व विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुर्मूंना 27 पक्षांचा आणि यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठिंबा होता. द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात असताना त्या पंधरा वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतात.
21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. तर आज द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या तर भारताला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. आज मुर्मू विजयी झाल्या तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होणार आहेत.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ संपत असून 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त
‘या’ नऊ राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर
“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”
“ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय तर मग आता धनगर आरक्षणही द्या”
‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना
Comments are closed.