…आणि शिवसेनेच्या दोन नगरसेविका एकमेकींना भिडल्या

मुंबई | कल्याण महानगरपालिकेत शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरुन तुफान राडा झाला. हा सर्व प्रकार आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाबाहेर झाला आहे.

नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका आशालता बाबर यांच्यामध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर प्रेमा म्हात्रे यांनी माझ्या कानशिलात लगावली, असा आरोप आशालता बाबर यांनी केला होता.

आशालता बाबर यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. तर मी बाबर यांना मारहाण केलीच नाही, असा दावा प्रेमा म्हात्रे यांनी केला आहे.

दरम्यान, वादावादीनंतर हा मुद्दा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न