दानवेंविरोधात विजयच नाही तर 50 हजार मताधिक्क्यांनी निवडून येणार!

औरंगाबाद | दानवेंविरोधात सिल्लोडमधून केवळ विजयीच नाही तर 50 हजार मताधिक्क्यांनी निवडून येणार, असा दावा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय.

सत्तार यांनी मोदी लाटेतही सिल्लोडमधून आपला गड कायम राखला होता. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांचा मुलगा संतोष दानवे यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय.

लोकसभेत मला मतदान मिळते मग विधानसभेला भाजपचा उमेदवार कसा पडतो?, असा प्रश्न उपस्थित करत दानवेंनी सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर वर्षभरात कोट्यवधीचा निधी आणल्याचा दावाही केला.