गुजरातमध्ये राष्ट्रवादी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत?

अहमदाबाद | गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसनं उमदवारांची यादी काल जाहीर केली. यादी जाहीर करताना काँग्रेसनं राष्ट्रवादीशी कोणतीही चर्चा केली नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.

गुजरातमध्ये 8 आणि 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडल्यावर राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.