‘तो’ फक्त माझाच आहे म्हणत पप्पांच्या पऱ्या भिडल्या, व्हिडीओ व्हायरल
औरंगाबाद | ‘तो’ माझा आहे, नाही ‘तो’ माझा आहे… म्हणत औरंगाबादमध्ये तीन मुंलींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.
एखाद्या गुडांनाही लाजवेल अशी हाणामारी (Fight) या मुलींमध्ये झाल्याचं पहायला मिळतंय. हल्ली मुलींना मुलांपासून वाचवण्याचं प्रशिक्षण(Training) दिलं जातं. मात्र येथे मुली एकमेकांशी भिडल्याचं पहायला मिळत आहे.
सध्या मुलींमध्ये हाणामारी होण्याचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतयं. याचं कारण अनेकदा एकच असल्याचं कळतंय ते म्हणजे प्रेमप्रकरण(love affair) किंवा मुलांवरुन हा राडा अनेकदा झाल्याचं पहायला मिळत आहे.
औरंगाबादच्या(Aurangabad) एका महाविद्यालयाबाहेर ही हाणामारी झाली. ही हाणामारी दोन विरुद्ध एक अशी पहायला मिळाली. दोन मुलींनी एका मुलीला मारलं. तिचे केस ओढून बेल्टनेदेखील मारलं आहे.
त्या एकट्या असलेल्या तरुणीने त्या दोघींचा प्रतिकार (Resistance) करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यांची भयंकर भांडण बघून तेथील पुरुषांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील त्या जुमानल्या नाहीत.
नागरिकांच्या केलेल्या प्रयत्नातून देखील त्यांची भांडणं संपत नसल्याचं समजल्यावर एका तरुणाने हुशारीने ती थाबंवली. त्यानंतर एक महिला रक्षक ((female guard)) तेथे आल्या आणि त्यांनी एका मुलीला बाजूला नेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
Comments are closed.