बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या बैठकीत तुफान राडा; कार्यकर्त्यांची लाथाबुक्क्यांनी मारहाण

नवी दिल्ली | डिसेंबर महिन्यात कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकांची तयारी सध्या जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. गोपालय्या यांनी बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीत तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हसन जिल्ह्यामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे माजी सहकारी एन. आर. संतोष हे यावेळी भाषण करत होते. त्यांच्या भाषणादरम्यान एका गटाने त्यावर आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

मंत्री गोपालय्या यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे दोन गट आपापसात भिडले आणि एकमेकांच्या जिवावर उठले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घोषणाबाजीपासून सुरू झालेलं हे प्रकरण बघता बघता हाणामारीपर्यंत गेलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मंत्र्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कार्यकर्ते थांबले नाहीत. त्यानंतर गोपालय्या देखील तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. के. गोपालय्या व एन. आर. संतोष यांनी अद्यापही या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. संतोष यांच्या भाषणावर आक्षेप घेणारे मोहन नाईक हे या हाणामारीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत दोन्ही गटांपैकी कोणीही पोलिसात तक्रार केलेली नाही. याबाबतचे वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचा मोठा निर्णय, आता खासगी फोटो आणि व्हिडीओ…

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

बायकोचा वाढदिवस विसरणं पडू शकतं महागात; ‘या’ देशाने केलेला कायदा वाचून थक्क व्हाल

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More