बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील पिंपरी येथे सतत हाणामारी होत असल्याच्या बातम्या समोर येतात. अशातच आता पुन्हा एकदा वाईन शाॅप समोर हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही हाणामारी वाईन शाॅप मालक आणि ग्राहकांमध्ये झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्समध्ये या प्रकरणाला सुरुवात झाली. दारुड्यांनी दुकानदाराला 700 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची दारु मागितली. यावरुन ग्राहक आणि दुकान चालकांमध्ये वाद पेटला.

पेटलेला वाद विकोपाला गेला आणि दारुड्यांनी रिगल वाईन्सची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ही संपुर्ण घटना तेथील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. झालेला गोंधळ पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, या प्रकरणात कीर्ती लक्ष्मण राजपूत यांच्या तक्रारीवरून चारही दारुड्यांविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या दारुड्यांचा शोध घेत आहेत. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी येरवडा येथे देखील दोन दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 2 रुपये अधिक खर्चुन मिळेल 365GB डेटा, फ्री काॅलिंग अन्…

पेट्रोल-डिझेलची दरवाढ काही थांबता थांबेना, सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलं

इम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ?

भारताने लसीकरणात महत्त्वाचा टप्पा केला पार, जगभरात भारताचाच डंका

घटस्फोटानंतर समंथाची पुन्हा एकदा न्यायालयात धाव, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More