Top News महाराष्ट्र सांगली

आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी

आटपाडी | खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर या भाजप नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होऊ लागला आहे. मंगळवारी या दोघांच्या गटात जोरदार मारामारी झाली.

दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली. या प्रकरणी संजयकाका आणि पडळकर या दोघांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या प्रकरणी पडळकरांचे बंधू तसंच जिल्हा परिषदचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासहल 12 जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, मंगळवारी दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर जमले. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना रात्रभर कसरत करावी लागली. ही परिस्थीती हाताळण्यासाठी पोलिस उपअधीक्षक अंकुश इंगळे परिस्थिती हातळ्यासाठी रात्री उशीरापर्यंत आटपाडी पोलीस ठाण्यात बसून होते.

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

“राऊत साहेब, हिंदुत्व हिंदुत्व नुसतं बोलायचं नसतं, कृतीतही उतरवावं लागतं”

राज्यातील जनतेने वीज बिल भरु नये- प्रकाश आंबेडकर

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या