बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगलीत दिवे लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारी

सांगली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवारी (5 एप्रिल) दिवे-टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. मात्र, मिरजमध्ये दिवे लावण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

एक कुटुंब दिवे लावण्याचा आग्रह करत होतं, तर अन्य कुटुंब दिवे लावण्यास विरोध करत होतं. यातून झालेल्या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झाला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करुन हे भांडण थांबवावं लागलं.

सांगलीतील या घटनेने पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावरुन समाजात दोन गट पडल्याचं समोर आलं. तसेच या हाणामारीनं या दोन गटातील संघर्षही पाहायला मिळाल्याची चर्चा मिरजमध्ये आहे.

दरम्यान, सोलापूर विमानतळ परिसरात मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दिवे लावून फटाके फोडण्यात आले. फटाक्यांमुळे सोलापूर विमानतळाजवळील गवताने पेट घेऊन भीषण आग लागली.

ट्रेंडिंग बातम्या-

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंना केलंय हे आवाहन

पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

महत्वाच्या बातम्या-

आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण

मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More