बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…- गोपीचंद पडळकर

मुंबई | पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण.. अशी अजित पवारांची अवस्था आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

11 मार्च रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी मी आंदोलन केलं, त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवलं. मग, जामीनावर सोडलं. अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

संयोजकावर का गुन्हा दाखल करतायं, अजित पवारांची जबाबदारी होती, कारण ते तिथं होते, हा कार्यक्रम लोकहिताचा नसून तुमच्या पक्षाचा होता. अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत, तेवढे मागे घ्या, असंही पडळकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More