महाराष्ट्र मुंबई

‘रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा’; चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटलांची भेट

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीये.

बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणं हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

पगार न मिळाल्याने संतापलेल्या ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या!

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’; संभाजी भिंडेंची मागणी

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार- अनिल देशमुख

या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या