बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

ठाणे | निवडणुकीच्या अगोदर राजकीय पक्षांकडून वेगवेगळी आश्वासने जनतेला दिली जातात. त्यातील काही पुर्ण केली जातात तर काही पुर्ण केली जात नाहीत. त्यातच आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती. ही आश्वासने पुर्ण न केल्याने शिवसेनेवर (Shivsena) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाणे आणि पालघर मनसे जिल्हाध्यक्षांनी केली आहे. (Avinash Jadhav’s demand to file a case of fraud against Shiv Sena)

ठाणे महापालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपुर्वी ठाणेकरांना तीस एकरमध्ये सेंट्रल पार्क, मुबलक पाणीपुरवठा, स्वत:साठीचे धरण तसेच ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारे जलवाहतूक ही आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. त्यामुळे ठाणे आणि पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाडा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे.

शिवसेनेकडून देण्यात आलेलं एकही आश्वासन आजतागायत पुर्ण करण्यात आलं नाही. याकारणामुळे ठाणेकरांची झालेली ही फसवणूक आहे. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने अशाप्रकारची फसवणूक करू नये, अशी मागणी करणारं निवेदन अविनाश जाधव यांनी पोलिसांना दिलं आहे.

दरम्यान, नौपाडा पोलिसांना निवेदन दिल्यानंतर या संदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू, हे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. आगामी काळात ठाणे महापालिका निवडणूक होणार असल्याने राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

राज्यातील निर्बंध वाढवणार का?, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More