बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्राण्यांना शारिरीक इजा केल्यामुळे भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा’; आयुक्तांकडे तक्रार

मुंबई | मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये काँग्रेसने आज इंधन दरवाढ व महागाईविरोधात केंद्र सरकार विरोधी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यासह इतरही काही काँग्रेस पदाधिकारी एका बैलगाडीवर चढून आंदोलन करत घोषणा देत असल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेसच्या या आंदोलनादरम्यान अचानक बैलगाडी तुटली व भाई जगताप यांच्यासह इतरही काँग्रेस पदाधिकारी खाली पडले. या घटनेवरून भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

केंद्र सरकार विरोधी करत असलेल्या या आंदोलनादरम्यान एकाच बैलगाडीवर 20 पेक्षा जास्त जण चढले आणि बैलाला जाणीवपूर्वक इजा केली त्यामुळे भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर प्राणी क्रूरता कायदा 11 व भादंवी कलम 428 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

भाजपच्या आंदोलनावरून बोलणारे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समज देत अशा प्रकारचे नौटंकी आंदोलन बंद करण्यास सांगावे, असा सल्लाही यावेळी अतुल भातखळकर यांनी दिला आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असं देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More