Top News महाराष्ट्र मुंबई

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

Photo- Youtube Video Screenshot

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतल्या ९४ पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात निवेदन देण्यात आलं आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदनही आयुक्तांना देण्यात आलं.

आम्ही पोलिस आयुक्तांवर सविस्तर चर्चा केली आहे. या प्रकरणावर कायदेशीर सल्ला घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन आम्हाला पोलीस आयुक्तांनी दिल्याचं परमबीर सिंग यांनी सागितलं आहे, असं भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे, त्यामुळं योग्य ती कारवाई करुन पोलीस अर्णबला अटक करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असंही भाई जगताप यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

बायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य!

‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या