बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोमॅटो डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल

बंगळुरू | काही दिवसांपूर्वी एका महिलेनं झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. मात्र, ऑर्डर यायला उशिरा झाल्यामुळे तिने मागवलेलं जेवण कॅन्सल केलं. या गोष्टीचा राग आल्यानं डिलीव्हरी देणाऱ्या मुलाने तिला मारलं आणि यात तिला नाकाला जबर मार लागला असा दावा एका व्हिडिओद्वारे तिने केला हाेता.

या सर्व प्रकरणाला आता वेगळं वळण प्राप्त झालं असून हितेशा चंद्राणी या माॅडेलवर आता डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कामराज या डिलिव्हरी करणाऱ्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शिवीगाळ करून मारहाण करणे आणि खोटी तक्रार दाखल करणे हे आरोप हितेशावर करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. तसेच अनेक बड्या मंडळींनी या वादात उडी घेऊन कामराजच्या बाजुने उभं राहण्याची भुमिका घेतली होती. बॉलिवुडची अभिनेत्री परिणीती चोप्राने देखिल या वादात उडी घेऊन या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर आणण्याची विनंती झोमॅटोला केली होती. “कामराज हा डिलिव्हरी बॉय दोषी आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे झोमॅटोने चौकशी करून या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा”, अशा आशयाचं ट्विट करून परिणीती कामराजच्या बाजुने उभी राहीली होती.

झोमॅटोनेसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचं आश्वासन दिलं आणि महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलत आहोत असं स्पष्टीकरण एका निवेदनातुन दिलं. या प्रकरणात कामराज या डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला कामावरून निलंबित करण्यात आलं असून त्याचा न्यायालयीन खर्च कंपनी उचलत असल्याचंही सांगण्यात आलं.

थोडक्यात बातम्या – 

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More