बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचा सेनेला पहिला धक्का! रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल

नाशिक | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर आता शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद शिगेला पोहचला आहे. आज दुपारी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचच लक्ष होतं. त्यानंतर आता भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना मुखपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे यांना निशाणा बनवलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर सडकून टीका करण्यात आली होती. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत शिवसेनेने राणेंवर टीकास्त्र सोडलं होतं, तसेच भाजपला देखील खडेबोल सुनावले होते. नारायण राणे यांच्यावर खालच्या दर्जात टीका केल्यानं भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका भाजप पदाधिकाऱ्याने रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत रश्मी ठाकरे यांचं नाव आल्यानं आता सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. दुपारी नाशिकमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात भाजपने पोस्टरबाजी केली होती. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. त्यानंतर आता तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या आक्षेपार्य वक्तव्यानंतर पहिला गुन्हा हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता नाशिक पोलीस आयुक्त कोणती भूमिका घेतात हे पहावं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अशा’ पद्धतीचं शिक्षण घेण्यास कोणाचाच नकार नसेल, पाहा व्हिडीओ

राखी सावंतला चावला कुत्रा?, पाहा व्हिडीओ

आता संपलं वाट पाहणं!; नेक्सॅानपेक्षा कमी किंमतीत मिळणार टाटांची ‘ही’ नवीन SUV!

कमाल आर खान अडचणीत, मनोज वाजपेयींकडून खटला दाखल!

शांतीचा संदेश देणाऱ्या ‘MIT’मध्ये साध्वी प्रज्ञांचं वेबिनार, विद्यार्थी संघटनांचा विरोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More