मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) चर्चेत आहे. न्यू्ड फोटा शूट केल्याने त्याच्याविषयी बरंच काही बोललं जात आहे. काहींनी या फोटोंना पाठिंबा दिला आहे तर काहींनी यावर जोरदार टीका केली आहे. काही सामाजिक संस्था देखील याला विेरोध करत आहेत. आता एका सामाजिक संस्थेने (NGO) रणवीर सिंग विरूद्ध मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रणवीर सिंगने न्यू्ड फोटो शूट केल्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करत एका सामाजिक संस्थेने रणवीर सिंग विरूद्ध मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जर न्यू्ड फोटो शूट करणं हे स्वातंत्र्य आणि कला असेल तर महिलांवर बुरखा घालण्यासाठी जबरदस्ती का?, असा सवाल करत समाजवादी पक्षाचे चीफ अबू आजमी (Abu Azmi)यांनी यावर टीका केली होती. तसेच अनेकांनी रणवीरला ट्रोल केल्याचंही पाहायला मिळालं.
रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर अनेक बॉलिवूड मंडळींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जर रणविर सिंग यामुळे आनंदी असेल तर आपण त्याचा सन्मान करायला हवा असं मत अर्जून कपूर(Arjun kapoor) याने व्यक्त केलं आहे. तर माझ्या आवडत्या सहकलाकाराबद्दल नकारात्मक चर्चा केलीली सहन करू शकत नाही म्हणून हा प्रश्न देखील मी सहन करू शकत नाही, असं आलिया भट्ट(Aaliya Bhatt) यावर स्पष्ट बोलली.
दरम्यान, मागे एका मुलाखतीत रणवीर सिंग म्हणाला होता की, मी काय घालतो, मी काय खातो यावर लोक काही बोलले तरी मला फरक पडत नाही. त्यामुळे लोकांनी मला ट्रोल केलं तरी मला काही वाटत नाही. त्यामुळे मला जे हवं आहे ते मी करतो.
थोडक्यात बातम्या-
संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर
‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Comments are closed.