बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार”

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. देशात महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका असल्याने पेट्रोलच्या किंमती वाढत नाहीत, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरचं संपणार आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे. येत्या 7 मार्च रोजी उत्तर प्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशासह पाचही राज्यांचे निकाल लागणार आहेत. त्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.

भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींवर मत मागत आहेत. भाजप संपुर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक खुर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी परदेशातील आहेत, असा आरोप मोदीजी करतात. मात्र, आम्ही उत्तर प्रदेशचे आहोत. आमचे कुटूंब अलाहाबादचे आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय. येथे फक्त धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत. लोकांच्या खात्यात 15 लाख जमा करेन, असं मी कधीचं म्हणणार नाही, असं म्हणत राहुल गांधींंनी जोरदार टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली”

नरेंद्र मोदींवर टीका करण्याची काही गरज नाही, कारण…- शरद पवार

Weather Update: पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

“शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात संजय राऊतांचा पुढाकार होता”

“ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More