बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागीन डान्स करत कोरोना बरा करणाऱ्या भोंदू बाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश

नागपूर | कोरोनाच्या महामारीमध्ये आरोग्य अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत काम करत आहेत. काही लोक माणुसकीला जागत मदत करत आहेत तर काहीजण या संकटाचा फायदा घेत लोकांना फसवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करत आहेत. अशाच प्रकारे नागपुरमधील भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम तायडे असं भोंदूबाबाचं नाव आहे.

शुभम तायडे हा कोरोनावर उपचार करतो अशा थापा मारत होता. आपल्या अंगात शेषनाग अवतरतो असं तो लोकांना सांगायचा. या ढोंगी बाबाचं कारस्थान एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने उधळून लावलं.

गुरुवारी 13 मे रोजी सापळा रचत पोलिसांनी रात्री 9 वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध असतानाही तेथे 50 च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झालं.

दरम्यान, पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा 2013 नुसार अटक केली. यासोबतच लॉकडाऊनमध्ये भक्तांना गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला. बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. बाबाला सोडण्याची मागणी व पोलिसांविरोधात घोषणाबाजी यावेळी केली जात होती. पोलिसांनी जेव्हा समजून सांगितलं त्यानंतर ती गर्दीही ओसरली.

थोडक्यात बातम्या-

युपीएससीची परीक्षा क्रॅक करणाऱ्या प्रांजलला कोरोनाने हिरावलं, उपचारादरम्यान मृत्यु

कोरोनाने निधन झालेल्या मोठ्या भावाला मिठी मारून रडला, सकाळी दोघांवर झाले अंत्यसंस्कार

शाब्बास पुणेकरांनो! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर 3000 पेक्षा जास्त डिस्चार्ज

लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात! एका नवरीशी लग्नासाठी आले दोन नवरदेव, त्यानंतर घडलं अस काही की…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More