बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

अहमदाबाद | आरोपीला पकडण्यासाठी आजकाल पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करताना दिसतात. पोलीस यंत्रणेला आता तंत्रज्ञानाची जोड दिल्यानं पोलिसांना काम करण्यास मदत होत आहे. काही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना विविध वेशभुषा धारण करतात. अशाच एक आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुजरातच्या अमरपुरा गावात ही घटना घडली आहे.

किशोर पांचाळ उर्फ केके या आरोपीने काही दिवसांपुर्वी वाहने चोरी केली होती. त्यानंतर केकेचा शोध घेण्याचा प्रयत्न गुजरात पोलीस करत होते. गुन्हे शाखेकडून वाहन चोरीच्या दोन प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला. अमरपुरा गावातील एका ढाब्यावर केके असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचं अॅक्युरेट लोकेशन शोधून काढलं. त्यानंतर पोलिसांनी ढाब्याच्या आसपासच्या परिसरात फिल्डिंग लावली. अत्यंत साध्या वेशात पोलीस ढाब्यात आले.

सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी ढाब्यात प्रवेश केला. आरोपीसोबत आणखी 3 जण त्याठिकाणी होते. ते तिघेही आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी जागेवरून उठण्याच्या आत त्यांनी आरोपींभोवती वेढा दिला आणि सर्व बाजूंनी आरोपींना पकडण्यात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अहमदाबादमधील 10 पोलीस ठाण्यांसह बनासकांठा आणि राजस्थानमध्ये त्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत.

शस्त्र लूट, वाहन चोरी, खंडणी, घरफोडी, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे केकेच्या नावावर आहेत. गुन्हे शाखेकडून वाहन चोरीच्या दोन प्रकरणांचा तपास सुरू होता. त्या प्रकरणी चांदखेडा आणि साबरमती पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले होते. त्यात केकेचा हात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही त्याचे लोकेशन शोधून काढले आणि अखेर त्यांना अटक केल्याचं अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! आळंदीच्या नगराध्यक्षांसह इतके वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

“भाजपने ईडी आणि सीबीआयचं वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच बाकीये”

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More