बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिलीप कुमार नसलेली चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे नसलेलं राजकारण”

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं काल निधन झालं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दिलीप कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे, असं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलंय.

हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच, ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत, असं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलंय.

वयाच्या विशीत युसूफ खान या नावाचा एक तरुण चित्रपटसृष्टीत येतो आणि सरिता स्वतःचा मार्ग स्वतः बनविते त्याप्रमाणे प्रखर आत्मविश्वास, कलेवरील अढळ निष्ठा आणि प्रत्यक्ष काम चोखपणे पूर्णत्वाला नेण्याची जिद्द याची कास धरून आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. दिलीप कुमार हा चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच म्हणायला हवा, असं राऊत म्हणाले.

मूळ पाकिस्तानचे असलेल्या दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारनेही ‘निशान-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च नागरी किताब दिला होता. पाकिस्तानचा हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी दिलीप कुमार यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेनाप्रमुखांच्या मैत्रीत त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही, असं राऊतांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

जी जबाबदारी मिळालीये त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन- भारती पवार

राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक; जवानांकडून पाच अतिरेक्यांचा खात्मा

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More