बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कन्हैया कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा, तो भाजपमध्येही जाऊ शकतो”

नवी दिल्ली |  काॅंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. कन्हैया कुमार जेएनयुमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. तेव्हा तो राजकीय वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत राहत होता.  काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैया कुमारचे जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी व्हिडीओचा आधार घेत कन्हैया कुमारवर टीका केली आहे.

अशोक पंडित यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये  भारताचा विनाश करण्यासाठी काॅंग्रेसच जबाबदार असल्याचं कन्हैया कुमारने म्हटलं होतं. त्यानंतर कन्हैया कुमारने काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता जर काॅंग्रेस वाचली नाही तर देशही वाचणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. हे दोन्ही व्हिडीओ अशोक पंडित यांनी ट्विटर शेअर करत कन्हैया कुमारला टोला लगावला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कन्हैया कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा. राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील, तेव्हा कन्हैया कुमार भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, त्याबद्दल आश्चर्य वाटून घेऊ नका,  अशी टीका अशोक पंडित यांनी कन्हैया कुमारवर केली आहे.

दरम्यान, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्याकडे राज्य आणि देशाचं सरकार असुनदेखील ही व्यक्ती तुरूंगामध्ये नाही. का आपल्या अपयशाचे ढोल वाजवत जगाला सांगत आहात, अशी प्रतिक्रिया सतीश कुमार या युजरने सोशल मीडियावर दिली आहे. तर भाजपमधून गेल्यावर काॅंग्रेसमध्ये तर काॅंग्रेसमधून बाहेर गेल्यावर भाजपमध्ये जातात. दोघांनी मिळून एकच पक्ष तयार करावा हे बंंर होईल, असंही एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

कडक सॅल्यूट! एकही सुट्टी न घेता 8 महिन्यात केलं तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण

“सरकारने एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं”

“राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही”

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More