Mumbai | येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली.
आता तिसऱ्या यादीत 9 जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती.
दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत 9 जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Sharad Pawar गटाची अंतिम यादी
१. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम
महत्त्वाच्या बातम्या-
‘…तर तुम्हाला एवढं झोंबलं का?’; राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला
‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान
‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल