बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई लोकलने करता येणार प्रवास

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील लोकलसेवा बंद करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. मात्र अशातच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडू या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी परीक्षेचे हॉलतिकीट आणि ओळखपत्र स्वत:जवळ असणं गरजेचं आहे. ओळखपत्र आणि हॉलतिकीट जवळ असेल त्याच विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.

दरम्यान,  विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरू करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांवर खडसेंनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसाचं उत्तर, म्हणाल्या…

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

21 सप्टेंबर नव्हे आता ‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

…तर पुढच्या बैठकीला काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत- अजित पवार

उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More