बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ये रिश्ता क्या कहलाता है?; सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा

मुंबई | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा खान घराण्याची सुन होणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र आता सोनाक्षीने स्वत: इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे तिच्या रिलेशनशिपचा खुलासा झाला आहे. सोनाक्षीने कालच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी पोस्टमधील व्यक्ती सोनाक्षीचा बॉयफ्रेंड असल्याचा खुलासा केला आहे.

सोनाक्षीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं आहे, मला जगात सर्वात जास्त त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तसंच हा व्यक्ती जगातील सर्वात चांगला व्यक्ती देखील आहे. हे कसं शक्य आहे? तू असा कसा काय असू शकतो? जन्म घेण्यासाठी धन्यवाद, हॅपी बर्थडे, असं म्हणत तिने जहिर इक्बालला शुभेच्छा दिल्या आहेत.

एकंदरीतच सोनाक्षीच्या पोस्ट वरून सोनाक्षी जहिरच्या प्रेमात आहे, अशा चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलं आहे. एवढचं नाही तर सोनाक्षीच्या पोस्टला जहिरने दिलेल्या रिप्लायमुळे हा संशय अधिकच बळकट होत आहे. सोनाक्षीच्या पोस्टवर जहिरने आता अधिकृतरित्या ‘मी तुला माझी हिरोईन म्हणू शकतो’, असं लिहीलं आहे.

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा हिचं नाव जहिर इक्बालसोबत जोडलं जात आहे. काल म्हणजे 10 डिसेंबर रोजी जहिरचा वाढदिवस होता. सोनाक्षीने यादिवशी जहिरसोबतचा फोटो शेअर करत जहिरला शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये जहिरने सोनाक्षीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी दोघांच्या रिलेशनशीपचा अंदाज बांधला आहे.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

थोडक्यात बातम्या-

“तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”, अभिनेत्री मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More