मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळं अडचणीत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयलचा आरोप केला आहे. त्यामुळं राखी सावंत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
राखीनं मीडियासमोर आदिलचे तनु नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं. राखीनं तनुला आदिलपासून दूर राहण्याचा इशारदेखील दिला होता. राखीनं तनुचं नाव घेतल्यानंतर ही तनु नेमकी कोण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
तनुचं पूर्ण नाव तनु चंदेल नामक असं आहे. ती एक अभिनेत्री आणि माॅडेल आहे. आता राखीनं वारंवार तिच्यावर आदिसोबत संबंध असल्याचे आरोप केल्यानंतर अखेर तनुनं मौन सोडलं आहे.
नुकतीच तनुनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हटली आहे की, राखी मी तुझ्यासमोर आणि तुझ्या मित्रमंडळासमोर या आधीच स्पष्ट केलं आहे की मी तुझ्या आदिलसोबत नाही.
मला सगळं काही कळाल्यानंतर मी आदिलची बाजू घेतली नाही. हे प्रकरण तुझं आणि तुझ्या नवऱ्यामधील आहे. मला उगाच यात ओढू नकोस,असंही तनु म्हणाली आहे.
दरम्यान, आदिलला या प्रकरणी अंधेरी न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता या सगळ्या प्रकरणानंतर राखीचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही, असं म्हणायला काही हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी सोडली राष्ट्रवादीची साथ; केला ‘या’ पक्षात प्रवेश
- लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; 21 वर्षांची होताच मिळतील ‘इतके’ लाख
- चर्चा तर होणारच ना; फिनालेपूर्वीच शिव ठाकरेला लागलीय मोठी लाॅटरी
- ‘आमचंही ठरलंय धडा कसा शिकवायचा’; ब्राम्हण समाज संतप्त
- …म्हणून लग्नानंतर पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होतात!