बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

मुंबई | विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त आपलं नवं गाणं सादर केलं आहे. 8 मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

“कुणी म्हणालं वेडी कुठली, कुणी म्हणालं खुळी” असे बोल असलेले त्यांच नवं गाणं आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी आपल्या ‘ट्विटर’ हँडलरवर त्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याला आत्तापर्यंत 1000हून जास्त व्हियू मिळाले आहेत. अमृता फडणवीस यांच्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. हे गाणं नाट्य संगीतावर आधारित आहे. भावनांच्या “या जगतात गडबडले मी गडगडले”. असा उल्लेख या गाण्यात आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतं आहे. मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीसांच नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं होतंं. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव होतं. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला.

थोडक्यात बातम्या –

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्तर

महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच महिला खासदारांना संसदेत बोलण्याची संधी

ठाकरे सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं?, पाहा एका क्लिकवर!

“मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More