अखेर अर्थमंत्र्यांकडून जाहीर! ‘इतका’ असणार यंदाचा जीडीपी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मंगळवारपासून संसदेचे अर्थसंपल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाची सुरूवात सकाळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणापासून झाली.

द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण संपताच या अधिवेशनाच्या कामकाजासाठी खासदार लोकसभेत आले. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले.

या सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, यंदाचा म्हणजेच 2023-24 मध्ये भारताचा विकास दर(GDP) 6.5 टक्के राहील असं सांगण्यात आलं आहे.

गतवर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणात 2023-24 देशाची अर्थव्यवस्था 8 ते 8.5 टक्क्यांनी वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं दिसत नाही.

रशिया-युक्रेन युद्ध आणि जगावर असलेल्या आर्थिक संकटामुळं गतवर्षी सांगितलेल्या अंदाजापेक्षा यंदाचा विकास दर कमी असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-