बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील काही भागांमध्ये यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी मोठा पूर आला होता. राज्यातील 55 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मराठवाडा, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागात पावसाचं प्रमाण अधिक झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. कोकणात अतिवृष्टी झाल्यानं चिपळूण, महाड भागात जनजीवन पार विस्कळीत झालं होतं. तर मराठवाड्यातील 38 लाख हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या सर्व नुकसानीसाठी राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 हजार कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल 55 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं होतं. राज्यभरातून शेतकरी मदतीसाठी आक्रोश करत होते. विरोधी पक्षांनी राज्य सरकार मदत करत नसल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, जिरायती शेतीसाठी 10 हजार, बागायती शेतीसाठी 15 हजार, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार आहे. सरकारद्वारे मिळणारी ही मदत 2 हेक्टर क्षेत्रफळापुरती मर्यादित असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट 

 

थोडक्यात बातम्या 

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More