अखेर बागेश्वर महाराजांनी स्पष्टीकरण देत मागितली जाहीर माफी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या बागेश्वर धाम सरकार(Bageshwar Dham Sarkar) या नावानं प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शात्री(Dhirendra Shastri) यांची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल(Sant Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

संत तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारायची. त्यांची बायको त्यांच्यावर प्रेम करत नसल्यानं ते देवाच्या प्रेमात पडले, अशा आशयाची एक गोष्ट त्यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर वारकरी संप्रादायाकडून त्यांना विरोध करण्यात आला. तसेच राजकीय नेत्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच बागेश्वर महाराजांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

अखेर नुकतीच बागेश्वर महाराजांनी झालेल्या या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आहे. यावर स्पष्टीकरण देताना बागेश्वर महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराज हे महान संत होते, ते माझेही आदर्श आहेत. माझ्या वक्तव्यामुळं वारकरी संप्रादायला दु:ख झालं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो.

मी ही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती, त्याचा उल्लेख मी केला. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आपला हेतू नव्हता, असंही बागेश्वर महाराज म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-