बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं; मुंबईत 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | कोकणाच्या किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळानं थैमान घातलं होतं. तर मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यानंतर आता अखेर भीषण तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं आहे. त्यावेळी 185 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते.

तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं असलं तरी त्याचा प्रभाव आणखी 24 तास राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात 48 तासानंतरही कायम राहणार आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात तौक्ते चक्रीवादळामुळं वादळी वाऱ्यासह पाऊस  झाला होता. त्यातच 3 खलाशी बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली होती. तर मुंबईतील पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जिल्ह्यांतील 13389 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील 4563, सिंधुदुर्ग 190, ठाणे 53, पालघर 200 आणि रायगड जिल्ह्यातील 8383 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रजनीकांत आले पुढे, केली इतक्या लाखांची मदत!

टाटांच्या इलेक्ट्रिक कारला देशवासियांची सर्वाधिक पसंती, आता केला ‘हा’ मोठा विक्रम!

वयाच्या 92व्या वर्षी ‘या’ ज्येष्ठ शेतकरी नेत्याने केली कोरोनावर मात

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More